गोल पोस्ट इतर राजकारण जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करू: पवार

जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करू: पवार

बारामती: “कोणी काहीही म्हणत असले तरी महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना सन्मानाची जागा दिली आहे. सन्मान जन्य अशा उमेदवारांना निवडून दिले. लोकांनी आमच्याकडून अपेक्षा ठेवल्या आहेत त्यांची पूर्तता करण्याचे काम आम्ही जरूर करू” अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील मतदारांसमोर व्यक्त केली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देताना शरद पवार बोलत होते. लोकांनी विरोधी पक्ष म्हणून आम्हाला निवडून दिले आहे व आम्ही जनतेच्या अपेक्षांना पुढील पाच वर्षाच्या कालावधीत पूर्ण करू अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!
Exit mobile version