गोल पोस्ट महाराष्ट्र ग्रामीण स्वराज्य अभियानांतर्गत अभ्यास दौऱ्यात जरंडी ग्रामपंचायतीच्या समावेश

ग्रामीण स्वराज्य अभियानांतर्गत अभ्यास दौऱ्यात जरंडी ग्रामपंचायतीच्या समावेश

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर १४ जानेवारी २०२४ : जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय ग्रामीण स्वराज्य अभियानांतर्गत जिल्ह्याबाहेर अभ्यास दौऱ्यात आदर्श गाव जरंडी ग्रामपंचायतीच्या समावेश झाला असून यासाठी ग्रामसेवक सुनील मंगरुळे रवाना झाले आहेत.

ग्रामपंचायतीच्या मूलभूत सुविधा सह ग्रामीण भागात अधिकाधिक सक्षम करण्यासाठी जिल्ह्यातील वैजापूर, खुलताबाद, गंगापूर या तीन पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली चार ग्रामसेवकासह दोन सरपंच रवाना झाले आहेत.

शुक्रवारी या पथकांनी राजस्थान मधील कालवाड ता.झोतवाडा (जयपुर) या ग्रामपंचायतीची पाहणी केली. राजस्थान च्या धर्तीवर जिल्ह्यातील ग्रामपंचायतचा विकास करण्यासाठी या जिल्ह्याबाहेर अभ्यास दौरा जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या वतीने करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ओमप्रसाद रामावत यांच्या अध्यक्षतेखाली हे अभ्यास पथक चार दिवसाच्या अभ्यास दौऱ्यावर राजस्थान मध्ये रवाना झाले आहे

न्यूज अनकट प्रतिनिधी : गजानन राऊत

error: Content is protected !!
Exit mobile version