गोल पोस्ट इतर राजकारण पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचे कोरोनाने निधन

पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचे कोरोनाने निधन

पिंपरी चिंचवड, १ ऑगस्ट २०२० : पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादीला दुसरा झटका बसल्याचे बोलले जात आहे.

जावेद शेख हे आकुर्डी येथून सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. १६ जुलै रोजी जावेद शेख यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळच्या सुमारास त्यांची उपाचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

या अगोदर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. जावेद शेख यांच्या जाण्याने राष्ट्रवादीला दुसरा मोठा धक्का बसला आहे. पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने रुग्णही वाढू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version