गोल पोस्ट गुन्हा जेजुरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,अकरा जणांवर कारवाई

जेजुरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,अकरा जणांवर कारवाई

पुरंदर, दि. ६ जून २०२०: पुरंदर तालुक्यातील साकुर्डे येथील जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड टाकली. या धाडीत ११ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ११ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर तीन पत्ती जुगार पैशावर खेळताना सापडलेल्या या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.

जेजुरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दि.५ रोजी सव्वाचारच्या सुमारास जेजुरी नजीकच्या साकुर्डे गावच्या हद्दीत चव्हाणवस्ती येथील जगताप पोल्ट्री फार्म जवळ मोकळे जागेत उघड्या मैदानावर जुगार अड्डा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली‌ फौजदार विजय वाघमारे यांनी सहकार्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ११ लोक गोलाकार पद्धतीने तीन पत्ती जुगार पैशावर खेळताना रंगेहाथ सापडले.त्यांच्या जवळ ११,८०० रुपये रोख रक्कम मिळुन आली. हे सर्व जुगारी सासवड जेजुरी येथील रहिवाशी असलेल्याचे बोलले जात आहे.

साकुर्डे येथील जुगार अड्ड्यावरील धडक कारवाईमुळे पुरंदर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यात अजून किती गावात अशा पद्धतीने जुगार अड्डे चालवले जात आहेत हे पाहणे गरजेचे आहे. त्या प्रत्येक अड्ड्यावर पोलीस कारवाई करणार आहेत. त्यासाठी स्थानीक नागरिकांनी न घाबरता पोलीसांना कळवावे त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल याचा विश्वास यावेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिला आहे. लोकांनी अवैध व्यावसायिकांना पाठिशी घालू नये. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली जाऊ शकते यासाठी पोलीसांना सहकार्य करावे असे ही माने पुढे म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

, दि. ६ जून २०२०: पुरंदर तालुक्यातील साकुर्डे येथील जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड टाकली. या धाडीत ११ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ११ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर तीन पत्ती जुगार पैशावर खेळताना सापडलेल्या या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.

जेजुरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दि.५ रोजी सव्वाचारच्या सुमारास जेजुरी नजीकच्या साकुर्डे गावच्या हद्दीत चव्हाणवस्ती येथील जगताप पोल्ट्री फार्म जवळ मोकळे जागेत उघड्या मैदानावर जुगार अड्डा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली‌ फौजदार विजय वाघमारे यांनी सहकार्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ११ लोक गोलाकार पद्धतीने तीन पत्ती जुगार पैशावर खेळताना रंगेहाथ सापडले.त्यांच्या जवळ ११,८०० रुपये रोख रक्कम मिळुन आली. हे सर्व जुगारी सासवड जेजुरी येथील रहिवाशी असलेल्याचे बोलले जात आहे.

साकुर्डे येथील जुगार अड्ड्यावरील धडक कारवाईमुळे पुरंदर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यात अजून किती गावात अशा पद्धतीने जुगार अड्डे चालवले जात आहेत हे पाहणे गरजेचे आहे. त्या प्रत्येक अड्ड्यावर पोलीस कारवाई करणार आहेत. त्यासाठी स्थानीक नागरिकांनी न घाबरता पोलीसांना कळवावे त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल याचा विश्वास यावेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिला आहे. लोकांनी अवैध व्यावसायिकांना पाठिशी घालू नये. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली जाऊ शकते यासाठी पोलीसांना सहकार्य करावे असे ही माने पुढे म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version