गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुण्यातील मावळ भागात क्रीडा संकुलासाठी लवकरच संयुक्त बैठक

पुण्यातील मावळ भागात क्रीडा संकुलासाठी लवकरच संयुक्त बैठक

वडगाव मावळ, पुणे १० ऑगस्ट २०२३ : मावळ तालुक्यात अद्ययावत क्रीडा संकुल व्हावे, यासाठी मागील तीन वर्षांपासून आमदार सुनील शेळके सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत असून आज मुंबई मंत्रालय येथे राज्यांचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची त्यांनी भेट घेतली. क्रीडा संकुल उभारण्याच्या कामासंदर्भात संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी यावेळी केली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, क्रीडाक्षेत्रात आपल नाव लौकिक प्राप्त करता यावा, या उद्देशाने शासनाने तालुका तिथे क्रीडा संकुल हे धोरण राबविले होते. परंतु मावळ तालुक्यात संकुल उभारण्याबाबत कुठलीही पावले उचलण्यात आली नव्हती असे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले आहे.

मागील तीन वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करुनही अदयाप ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे तालुक्यात क्रीडा संकुल उभारणेबाबत क्रीडामंत्री बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात यावी, अशी मागणी केली असुन या मागणीला मंत्री बनसोडे यांनी मान्यता दिली असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version