गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे कात्रजच्या लेक टाउन सोसायटीची अजब मागणी!

कात्रजच्या लेक टाउन सोसायटीची अजब मागणी!

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेवर हरकती घेताना कात्रज येथील लेक टाउन सोसायटीने एक अनोखी मागणी केली आहे. सध्या ही सोसायटी प्रभाग क्र. ३९ मध्ये आहे, तर शेजारील कात्रज तलाव मात्र प्रभाग क्र. ३८ मध्ये जोडला गेला आहे. यावर आक्षेप घेत, नागरिकांनी तलाव आणि सोसायटी एकाच प्रभागात असावीत अशी मागणी केली आहे.

नागरिकांच्या मते, या विभाजनामुळे स्थानिक समस्यांवर तोडगा काढणे कठीण होईल. कात्रज तलावातील दुर्गंधी आणि जलपर्णीमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांकडे कोणी लक्ष देणार नाही, कारण प्रभाग ३८ आणि ३९ मधील लोकप्रतिनिधी एकमेकांवर जबाबदारी ढकलतील. त्यामुळे एकाच प्रभागात तलाव आणि सोसायटी आणल्यास समस्यांचे निराकरण अधिक वेगाने होईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

निवडणुकीपूर्वी नागरिकांच्या या मागणीवर महापालिका काय निर्णय घेते, हे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले

error: Content is protected !!
Exit mobile version