गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट किंग्स इलेवेन पंजाब संघाने दिल्ली कॅपिटल संघावर मिळवला ५ विकेट्स ने मिळवला...

किंग्स इलेवेन पंजाब संघाने दिल्ली कॅपिटल संघावर मिळवला ५ विकेट्स ने मिळवला विजय

दुबई : २१ ऑक्टोबर,२०२० आयपीएल २०२० मधील काल झालेल्या ३८ व्या सामन्यात किंग्स इलेवेन पंजाब संघाने दिल्ली कॅपिटल संघावर ५ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. याच विजयासोबात पंजाब संघाचे प्ले ऑफ मध्ये जाण्याचे मार्ग मोकळे होताना दिसून येत आहेत.

सामन्यात दिल्ली कॅपिटल संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करतांना दिल्ली कॅपिटल संघाचा सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ लवकर माघारी परतला. त्यानंतर मागच्या सामन्यात शतक ठोकणारा फलंदाज शिखर धवन याने या ही सामन्यात दणदणीत शतक ठोकले. शिखर धवन ने ६१ चेंडूत नाबाद १०६ धावांची खेळी केली.तसेच कर्णधार श्रेयस अय्यर याने १२ चेंडूत अवघ्या १४ धावा तर रिषभ पंत याने २० चेंडूत १४ धावा केल्या. २० षटक अखेर दिल्ली कॅपिटल संघाने ५ बाद १६४ धावा केल्या. पंजाब संघाकडून मोहम्मद शमी याने ४ षटकात २८ धावा देत २ विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स निषम आणि ग्लेन मॅक्सवेल यांना प्रत्येकी १,१ विकेट मिळाला.

१६५ धावांचा पाठलाग करताना निकोलस पुरण याने सर्वाधिक २८ चेंडूत ५३ धावा केल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेल याने २४ चेंडूत ३२ तर क्रिस गेल याने १३ चेंडूत २९ धावांची खेळी केली. तसेच दिल्ली कॅपिटल संघाकडून कगिसो रबाडा याने २ विकेट्स तर अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांना प्रत्येकी १ ,१ विकेट्स मिळाल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

error: Content is protected !!
Exit mobile version