गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे कोपर्डी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी जितेंद्रने पुणे कारागृहात गळफास घेऊन केली आत्महत्या

कोपर्डी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी जितेंद्रने पुणे कारागृहात गळफास घेऊन केली आत्महत्या

पुणे, १० सप्टेंबर २०२३ : नुकत्याच आलेल्या एका मोठ्या बातमीनुसार, महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीने येरवडा तुरुंगात आत्महत्या केली आहे. आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आरोपी जितेंद्र शिंदे याने स्वतःच्या कपड्याने गळफास घेतल्याची घटना आज पहाटे घडली. या घटनेची माहिती मिळताच अधिकारी तेथे पोहोचले. आरोपीचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला असून तेथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

कोपर्डी हत्याकांडातील आरोपी जितेंद्र शिंदे येरवडा कारागृहात होता. कारागृहातील सुरक्षा क्रमांक एकच्या १४ क्रमांकाच्या खोलीत पप्पूने सकाळी सहाच्या सुमारास टॉवेल फाडून खोलीच्या दाराला गळफास घेऊन आत्महत्या केली. ड्युटीवर असलेले कारागृह कर्मचारी नीलेश कांबळे यांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी तातडीने सहकाऱ्यांना बोलावून पप्पूला खाली सोडवला. मात्र तोपर्यंत त्याला जीव गमवावा लागला होता. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

१३ जुलै २०१६ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ यांना अटक केली होती. नोव्हेंबर २०१७ मध्ये तिन्ही आरोपी दोषी आढळले आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, याविरोधात त्यांनी मुंबई खंडपीठात अपील केले होते आणि त्यावरही सुनावणी सुरू होती. कोपर्डी येथे मराठा आरक्षणासाठी ग्रामस्थांनी पुन्हा उपोषण सुरू केले असून या अत्याचार करणाऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version