गोल पोस्ट गुन्हा पुण्यातील येरवडा बालसुधाग्रहातून कोयता टोळी फरार

पुण्यातील येरवडा बालसुधाग्रहातून कोयता टोळी फरार

पुणे, ३१ जानेवारी २०२३ :पुण्यातील येरवाड्याच्या बालसुधार गृहातून मध्यरात्री कोयता टोळीतील सात खतरनाक विधीसंघर्ष मुले बालसुधरगृह तोडून पळून गेली आहेत. सातही विधीसंघर्षित बालके शहरात धुमाकूळ घालणाऱ्या, कोयता टोळीतील सदस्य असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, काल मध्यरात्री ११ ते १२ च्या सुमारास सुधारगृहाच्या संरक्षण भिंतीला शिडी लावून हे विधी संघर्षित बालक पळवून गेले आहेत. सुधारगृह तोडून पळाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे शहरांमध्ये पुन्हा कोयता टोळीची दहशत निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सातही आरोपींना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक केली असून बालसुधारगृहांमध्ये ठेवण्यात आले होते. यामुळे त्यांना पकडणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version