गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा कुटुंबांना धान्य-किराणा वाटप करून साजरा केला वाढदिवस!

कुटुंबांना धान्य-किराणा वाटप करून साजरा केला वाढदिवस!

लोणी काळभोर (प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका बांधकाम कामगार व गरीब बांधवांना बसत आहे. त्यामुळेच कदमवस्ती, राईलकर वस्ती या परिसरामध्ये अभिलाष पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ( ता.२० ) रोजी सेवाभावी उपक्रम राबवून बांधकाम कामगारांना एक किट ७०० रुपयेचे असे १० किट त्यांनी एकूण सात हजार रुपयेचा किराणा व धान्य गरीब कुटुंबियांना वाटप केले.

जगभर कोरोना महामारीचे संकट फैलावत असताना लॉकडाऊन काळात हातावर काम असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. अभिलाष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व्यंकटेश मित्र मंडळानी धान्य वाटप केले. त्यात गोडतेल, डाळ, हरभरा, चवळी, मिरची पावडर, हळद, गहू, तांदूळ, मीठ, साखर, साबण, या दैनंदिन वापरातील वस्तूंचा समावेश आहे व हे धन्य व्यंकटेश मित्र मंडळ यांच्या मार्फत वाटप करण्यात आले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version