गोल पोस्ट महाराष्ट्र नानगाव येथे शेतमजूरावर बिबट्याचा हल्ला

नानगाव येथे शेतमजूरावर बिबट्याचा हल्ला

दौंड, पुणे ३० जुलै २०२३ : नानगाव येथील मांगोबामाळ खळदकर वस्ती येथे राहत असलेले शेतमजूर काशिनाथ बापू निंबाळकर यांच्यावर शनिवारी रात्री अकराच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला केला. या हल्ल्यात शेतमजूर काशिनाथ निंबाळकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. हल्ल्याच्या वेळी प्रसांगावधान राहिल्याने शेतमजूरांचे प्राण वाचले आहे.

या भागात गेली अनेक वर्षांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. अनेकदा छोट्या मोठ्या जनावरांवर बिबट्यांनी हल्ले केले असून अशा हल्ल्यात प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र माणसांवर पहील्यांदाच असा हल्ला झाल्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version