गोल पोस्ट इतर राजकारण राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र हे ‘स्क्रिप्ट’चा भाग : संजय राऊत

राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र हे ‘स्क्रिप्ट’चा भाग : संजय राऊत

मुंबई, १७ ऑक्टोबर २०२२: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र हे ‘स्क्रिप्ट’चा भाग आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट भाजप आणि राज ठाकरेंवर केला आहे.

मुंबई सत्र न्यायालय परिसरात आजही खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसोबत चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. राज ठाकरेंचे भाजपला लिहिलेले पत्र म्हणजे स्क्रिप्ट’चा भाग असून, पोटनिवडणुकीत पराभवाची चाहूल लागल्यामुळे भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

जामीनावर उद्या होणार सुनावणी

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या कोठडीत असणारे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी उद्या म्हणजेच १८ ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपत होती त्यामुळे त्यांना ईडीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version