गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुनर्विकासाला विरोध लोकमान्य नगरमध्ये स्वाक्षरी मोहीम

पुनर्विकासाला विरोध लोकमान्य नगरमध्ये स्वाक्षरी मोहीम

दांडेकर पुलाजवळील लोकमान्य नगर वसाहतीतील रहिवाशांनी त्यांच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला स्थगिती दिल्याबद्दल तीव्र विरोध दर्शवला आहे. या स्थगितीच्या विरोधात नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून, ती तात्काळ मागे घेण्याची मागणी करत आहेत. रहिवाशांच्या मते, येथील ६० वर्षांपेक्षा जुन्या इमारती मोडकळीस आल्या आहेत.

पुनर्विकासासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, म्हाडाचीही परवानगी आहे. मात्र, काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी चुकीची माहिती देऊन राजकीय दबावामुळे ही स्थगिती मिळवली असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. यामुळे ८०३ कुटुंबांच्या मजबूत घरांचे स्वप्न भंगले आहे, असे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे रहिवाशांच्या हक्कांवर गदा येत असून, त्यांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले

error: Content is protected !!
Exit mobile version