गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे एक कार्यक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला: जिल्हाधिकारी राम

एक कार्यक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला: जिल्हाधिकारी राम

पुणे, दि. ७ मे २०२० : साहेबराव गायकवाड यांच्या निधनाने प्रशासनातील एक कार्यक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला, अशी शोकभावना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केली.

पुण्याचे विद्यमान अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे आज सकाळी पुणे येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या शोक सभेत त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली .

यावेळी राम यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनात कार्यरत असताना त्यांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले होते . जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडविण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. अतिशय मनमिळावू अधिकारी म्हणून महसूल विभागात त्यांची ओळख होती.

महसूल विभागातील अतिशय कार्यक्षम, मनमिळावू अधिकारी हरपल्याने अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही हळहळ व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version