गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या! ‘महाज्योती’च्या ऑनलाइन प्रशिक्षणामुळे विद्यावेतनावर कुऱ्हाड

विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या! ‘महाज्योती’च्या ऑनलाइन प्रशिक्षणामुळे विद्यावेतनावर कुऱ्हाड

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी ‘महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (महाज्योती) योजना आता अडचणीत सापडली आहे. यंदापासून प्रशिक्षण ऑनलाइन देण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारे मासिक विद्यावेतन बंद करण्यात आले आहे. यामुळे आर्थिक गरजा भागवून अभ्यास करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.

विद्यावेतन बंद करण्याच्या निर्णयावर विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक विद्यार्थी स्व-अभ्यासावर भर देत असल्याने त्यांना प्रशिक्षणापेक्षा आर्थिक मदतीची अधिक गरज असल्याचे सांगितले आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांना टॅबलेट आणि दररोज ६ जीबी डेटा मिळणार असला, तरी आर्थिक मदतीअभावी दैनंदिन खर्च भागवण्याचा प्रश्न उभा राहिला आहे.

विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी पुण्यातील ‘महाज्योती’ कार्यालयाचा संपर्क क्रमांक केवळ नावालाच असून, तक्रार करायची कोणाकडे, असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा येण्याची शक्यता आहे आणि योजना सुधारण्याची गरज उभी राहिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे

error: Content is protected !!
Exit mobile version