गोल पोस्ट आरोग्य पुणे महानगरपालिका व कृष्णा डायगनॉस्टिक यांच्या संयुक्त विद्यमानाने नागरिकांची आरोग्य तपासणी

पुणे महानगरपालिका व कृष्णा डायगनॉस्टिक यांच्या संयुक्त विद्यमानाने नागरिकांची आरोग्य तपासणी

पुणे, ५ जून२०२०: पुणे महानगरपालिका व कृष्णा डायगनॉस्टिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आज (शुक्रवारी) प्रभाग क्र. २९ड मधील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

कोरोनाचा पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये चेस्ट एक्सेरे, रक्ताची तपासणी, रक्तदाब तपासणी, हिमोग्लोबीन, शुगर , रक्तातील ऑक्सिजन अशा विविध तपासण्या करण्यात आल्या.
कोरोनाचा पार्श्वभूमीवर या तपासणी खूप आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाचा जेष्ठ नागरिकांमध्ये प्रसार होत आहे. त्यामुळे त्यांचा तपासणीला प्राधान्य देण्यात येत आहे.

कोरोनाचा तपासणी पूर्वी या तपासणी मधून काही लक्षणे आढळली तर पुढचे उपचार तातडीने घेता येतात.
या सर्व चाचण्याकरिता मोफत वातानूकुलित बस आहे. व सर्व काळजी घेत सुरक्षित अंतर ठेवून नागरिकांनी आरोग्य तपासणी वेळी प्रतिसाद दिला.

न्युज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

error: Content is protected !!
Exit mobile version