गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात!

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात!

दहावी बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आता विद्यार्थ्यांना ६ ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्कासह आपला अर्ज भरता येणार आहे. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना हे अर्ज आपल्या शाळांमार्फत ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत.

नियमित विद्यार्थ्यांसोबतच पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी आणि श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन अर्ज भरता येईल. त्यामुळे, सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत आपल्या शाळेच्या मदतीने अर्ज पूर्ण करावा आणि कोणत्याही अडचणीशिवाय परीक्षेची तयारी करावी. ही मुदत लक्षात घेऊन वेळेआधी अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे

error: Content is protected !!
Exit mobile version