गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा माजी आमदार स्व.चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त नीरेत रक्तदान शिबिर

माजी आमदार स्व.चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त नीरेत रक्तदान शिबिर

पुरंदर, दि. १६ जून २०२०: सहकार महर्षी माजी आमदार स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त नीरा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ७१ बाटल्या रक्त संकलीत करन्यात आले. यावेळी १० युवतींनी (मुलींनी) रक्तदान केले.
पुण्यातील भारती हॉस्पिटल व नीरा कोळविहीरे जिल्हा परिषद गट यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला मास्क, सॅनिटायझर व आर्सॅनिकम अल्बम ३० हे औषध देण्यात आले.

यावेळी पुरंदर हवेलीचे आ. संजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अॅड. विजय भालेराव, नीरेचे उपसरपंच विजय शिंदे, माजी सरपंच राजेश काकडे, चंद्रराव धायगुडे, माजी उपसरपंच दीपक काकडे, कल्याण जेधे, बापू गायकवाड, नंदू शिंदे, अभिजीत भालेराव, जावेद शेख, दत्ता निंबाळकर अभिजित जगताप, ओजस जैन, मयूर फरांदे, आकाश कदम, दिनेश गायकवाड, सुरज शिंदे सह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी युवकांनी प्रयत्न केले. या रक्तदान शिबिरांमध्ये विशेषता युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यावेळी युवकांच्या एक पाऊल पुढे ठेवून मुलीही रक्तदान करताना दिसून आल्या.

आमदार संजय जगताप यांनी नीरेतील ग्रामस्थांना आरोग्यमय शुभेच्छा दिल्या. सर्वांनी काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नका, सॅनिटायझरचा वापर करा, हात सतत धुवा, मास्क लावा. पुढील काळात कोरोनाशी दोन हात करण्यासाठी प्रशासनाकडून जी काय मदत लागेल किंवा आरोग्य विभागाकडून काही साहित्य लागल्यास ते तात्काळ मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून नीरेकर ग्रामस्थांना सर्व सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version