गोल पोस्ट महाराष्ट्र जालन्यात अवैधरित्या तीन धारदार तलवारी बाळगणारा एक जण जेरबंद

जालन्यात अवैधरित्या तीन धारदार तलवारी बाळगणारा एक जण जेरबंद

जालना ५ जानेवारी २०२४ : घरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा कारवाई करत जेरबंद केलेय. राहुल कैलास जाधव (वय २१ रा. भारतमाता मंदिर, नळगल्ली, जालना) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्याकडून तीन धारदार तलवारी जप्त केल्या आहेत.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अवैधरित्या शस्त्र बाळगणार्यांवर कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार तपास सुरू असताना संशयित राहुल जाधव याच्या घरात अवैध शस्त्र असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील भारतमाता मंदिर, नळगल्ली येथील संशयित राहुल जाधव याच्या राहत्या घरात छापा टाकून, घरातून तीन तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version