गोल पोस्ट महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर कार्यकर्त्यांचा गोंधळ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर कार्यकर्त्यांचा गोंधळ

कोल्हापूर, १५ ऑगस्ट २०२३ : मराठा आरक्षणावरून गेल्या काही वर्षात अनेक वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करण्यात आली. यामध्ये १८ मूक मोर्चे काढण्यात आले. लाखो मराठा बांधवांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदविला. त्यानंतरही वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने चालूच आहेत. शांतता मार्गाने आंदोलन करूनही अजूनही मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये सरकार विषयी रोष निर्माण झाला आहे. त्याचा प्रत्यय आज स्वातंत्र्यदिनी ही दिसून आला.

स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्याच्या काणोकोपऱ्यात विविध ठिकाणी ध्वजारोहण पार पडले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापुरात ध्वजारोहण झाले. हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पार पडला. यावेळी अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासंदर्भात अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्याचबरोबर मराठा समाजाच्या काही नेत्यांची बैठकही बोलावली. यावेळी एकच गोंधळ उडाल्याने एकच खळबळ मजली. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.

अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणाच्या प्रश्नांसाठी बैठकीत घेण्यात आली. त्यावेळी मराठा वनवास यात्रेचे अध्यक्ष योगेश केदार आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तर आपल्याला बोलू द्या. आम्हाला मराठा आरक्षणाच्या बैठकीपासून लांब ठेवले जात आहे. ही बैठक फक्त कोल्हापूरसाठीच मर्यादित आहे का? असा प्रश्न विचारत गोंधळ घातला. यावेळी अजित पवार यांच्यासमोरच हा गोंधळ झाल्याने पोलिसांनी केदार आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांना रोखले. यावरून तेथे गोंधळ उडाला. तर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version