पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘मराठी भाषा दिन’ व ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ कार्यक्रमाची सुरुवात झाली. चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते झाले.
यावेळी महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त तुषार सोंभेर, साहित्यिक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा व तिची समृद्ध परंपरा याबद्दल जनजागृती हा या सप्ताहाचा उद्देश आहे.
साहित्य, लोककला, व्याख्याने, स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आठवडाभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. आमदार गोरखे यांनी मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीचा कणा असल्याचे सांगून तरुणांना मराठीचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी साक्षी पांचाळ