गोल पोस्ट महाराष्ट्र जळगाव रेल्वे स्थानकावर माथेफिरूचा विजेचा शॉक लागून मृत्यू, मालगाडीवर चढताच बसला झटका

जळगाव रेल्वे स्थानकावर माथेफिरूचा विजेचा शॉक लागून मृत्यू, मालगाडीवर चढताच बसला झटका

जळगाव, १५ जुलै २०२३: जळगाव येथील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीवर चढत असताना विजेच्या धक्क्याने एका माथेफिरुचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, याबाबत रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर पेट्रोल वाहतूक करणारे टँकर उभे होते. यावेळेस एक अंदाजे ५० वर्षीय व्यक्ती याठिकाणी येऊन टँकरवर चढण्याचा प्रयत्न केला. वर चढताच वीज तारांना स्पर्श झाल्याने त्याला जोराचा झटका बसल्याने तो लागलीच खाली फेकला गेला. या घटनेत त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत आता रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस ठाण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अतिफ शहा यांनी सदर व्यक्तीला तपासणी करून मृत घोषित केले. रेल्वे पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल सचिन भावसार हे करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version