पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे निधन

गांधीनगर, ३० डिसेंबर २०२२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांनी वयाच्या शंभराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दोन-तीन दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता.आज पहाटे साडेतीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना बुधवारी तब्येत खालावल्याने अहमदाबादच्या यू. एन. मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटर येथे दाखल केले गेले होते.

मातोश्रींना श्रद्धांजली वाहत नरेंद्र मोदींनी आज ट्विट केले‌. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी हिराबेन मोदींना श्रद्धांजली वाहिली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगरमध्ये पोचले असून, त्यांच्या बंधूंबरोबर मातोश्रींवर अंत्यसंस्कार करणार आहेत.

१८ जून रोजी जूनला प्रधानमंत्री मोदींनी आपल्या आईच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक पोस्टसुद्धा शेअर केली होती. तर आजही ‘काम बुद्धीने आणि जीवन शुद्धीने जगायला हवं,’ या मातोश्रींचा कानमंत्राची आठवण ठेवत नरेंद्र मोदींनी ही दुःखद बातमी दिली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा