गोल पोस्ट समाजकारण मी मुसलमान, माझी बायको हिंदू तर आमची मुले भारतीय: शाहरुख खान

मी मुसलमान, माझी बायको हिंदू तर आमची मुले भारतीय: शाहरुख खान

मुंबई : बॉलिवूडचे किंग शाहरुख खान सध्या सिनेजगतापासून दूर असला तरी सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असल्याचे पहायला मिळत आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी शाहरुख खानचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत शाहरुख धर्म आणि भारताविषयी बोलताना दिसत आहे. त्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून याचे कौतुकही होत आहे.

याबाबत शाहरुख खान म्हणाला कि, मी मुसलमान, माझी बायको हिंदू आहे तर आमची मुले भारतीय आहेत. आम्ही कधी हिंदू-मुस्लिमांची चर्चा केली नाही. तो पुढे म्हणाला, अनेक वेळा मुले शाळेत गेली, तेव्हा त्यांना ऍडमिशन फॉर्मवर धर्म सांगावा लागत होता. माझ्या मुलीने लहान असताना अनेक वेळा विचारले कि, आपण कोणत्या धर्माचे आहोत. तेव्हा मी तिला सांगितले कि, आपण भारतीय आहोत.
कोणताही धर्म नाही आणि असणारही नाही, असे त्याने म्हंटले आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त स्टार प्लस वाहिनीवरील डान्स प्लसच्या शोमध्ये शाहरुख खानने हजेरी लावली होती. यावेळी त्याने आपल्या अनेक वैयक्तिक आणि प्रोफेशनल गोष्टी शेअर केल्या.

error: Content is protected !!
Exit mobile version