एमआयडीसी वाळूज परिसरातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी कठोर पावले उचलली असून या औद्योगिक क्षेत्रात दहशत पसरवणाऱ्या तीन अटल गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
गंभीर गुन्ह्यात सहभाग, शस्त्रांचा वापर, जबरी चोरी, महिलांचे दागिने हिसकावणे, नागरिक व उद्योजकांना धमक्या देणे आदी गुन्ह्यांच्या आधारावर शुभम वसंत वैद्य, योगेश शिवाजी मस्के आणि चैतन्य कैलास गायकवाड या तिघांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 अ व ब अंतर्गत दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
डीसीपी पंकज अतुलकर यांनी पदभार स्वीकारताच गुन्हेगारीचे सूक्ष्म निरीक्षण करून कडक कारवाईची भूमिका घेतली असून या ॲक्शनमुळे औद्योगिक परिसरात कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्याला मोठा हातभार लागल्याचे उद्योजक व कामगार वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: गजानन राऊत
