गोल पोस्ट इतर राजकारण पिंपरी-चिंचवड मध्ये पडळकर यांच्या प्रतिमेला दुधाच्या अभिषेकाचा कार्यक्रम

पिंपरी-चिंचवड मध्ये पडळकर यांच्या प्रतिमेला दुधाच्या अभिषेकाचा कार्यक्रम

पिंपरी चिंतन, २८ जून २०२० : गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. या टीकेमध्ये त्यांनी असे म्हटले होते की, शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत. या वक्तव्यानंतर पडळकर यांचा पूर्ण राज्यात निषेध करण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून ठिकाणी राज्यामध्ये त्यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून तसेच पुतळे पेटवून निषेध करण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यक्त केलेल्या या टीकेनंतर आता भाजपने देखील पडळकर यांना समर्थन दाखवण्यासाठी त्यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक घालण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. आज बारामती मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पडळकर यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक घालून त्यांचे समर्थन करण्यात आले तसेच आय सपोर्ट पडळकर अशा घोषणा देखील देण्यात आल्या.

याच पार्श्वभूमीवर आज पिंपरी-चिंचवडमध्ये देखील पडळकर यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक घालण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील सर्व धनगर बांधव आज सायंकाळी पडळकर यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक करणार आहेत. हा कार्यक्रम पिंपरी चिंचवड येथील आंबेडकर चौक येथे आयोजित करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version