गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे माईर्स एमआयटीतर्फे शांताबाई पवार यांना ५१ हजारांची मदत

माईर्स एमआयटीतर्फे शांताबाई पवार यांना ५१ हजारांची मदत

पुणे, दि. २६ जुलै २०२०: माईर्स एमआयटी, पुणे आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या स्मरणार्थ श्रीमती शांताबाई पवार यांना आर्थिक मदत म्हणून रोख ५१ हजार रुपये त्यांच्या घरी जाऊन देण्यात आली.

या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या पुढाकाराने ही आर्थिक मदत त्यांना देण्यात आली आहे. श्रीमती शांताबाई पवार या ८५ वर्षाच्या वयोवृध्द कलाकार असून त्या अनाथांसाठी आजही कार्य करीत आहे. त्यांच्या पालन – पोषणासाठी त्या रस्त्यावर डोंबारीचा खेळ करीत आहे. तसेच या वयातही युवकांना लाजवेल अशा प्रकारे लाठी चालवितात. परंतू कोरोनाच्या काळात त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

शांताबाई पवार यांनी ड्रीमगर्ल हेमा मालिनी आणि बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीसारख्या बर्‍याच सेलिब्रेटींबरोबर काम करून देखील त्यांना पोट भरविण्यासाठी रस्त्यावर तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यांनी हेमा मालिनी यांच्याबरोबर सीता और गीता या चित्रपटामध्ये दोरीवरून चालण्याचा डोंबार्‍याचा खेळ केला. तसेच त्रिशूळ या चित्रपटात साईड हिरो बरोबर काम केले आहे. तर श्रीदेवीबरोबर शेरणी चित्रपटामध्ये काम केले. ५१ हजार रूपये स्विकारल्यानंतर शांताबाई पवार आभार मानत  म्हणाल्या, ”संस्थेनी केलेली आर्थिक मदतीबद्दल आपल्या संस्थेला व आपल्याला कोटी कोटी धन्यवाद.”  

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

error: Content is protected !!
Exit mobile version