गोल पोस्ट आरोग्य जम्बो कोविड केअर सेंटर ला आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली भेट

जम्बो कोविड केअर सेंटर ला आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली भेट

पुणे, दि. १० ऑगस्ट २०२०: शिवाजीनगर येथील COEP कॉलेजच्या प्रांगणात व अण्णासाहेब मगर क्रीडांगण, पिंपरी येथे जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहेत. आज दुपारी भाजप पक्षाचे शिवाजीनगर परिसरातील आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी या उभारण्यात येत असलेल्या सेंटरला भेट दिली व आढावा घेतला. दोन्ही कोविड केअर सेंटर मध्ये प्रत्येकी ६०० ऑक्सिजन बेड व २०० व्हेंटीलेटर बेड असणार आहेत.

यावेळी पी.एम.आर.डी.ए महानगर आयुक्त श्री. सुहास दिवसेजी, महानगर नियोजक श्री. विवेक खरवडकरजी आणि दोन्ही केंद्रांसाठी जबाबदार ठेकेदार उपस्थितीत होते.

यावेळी ‘कोरोना महामारी चा विरोध्दाचा लढ्यात पुण्याचा वैद्यकीय पायाभूत सुविधांना मोठा आधार मिळणार आहे .व १९ ऑगस्टची अंतिम मुदत संपण्याच्या पूर्वी दोन्ही केंद्र रुग्णांसाठी तयार होतील असा विश्वास प्रशासन व कंत्राटदारानीं मला दिला आहे ‘ अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून केला आहे .

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

error: Content is protected !!
Exit mobile version