गोल पोस्ट राजकारण राजगुरूनगर महावितरण कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड

राजगुरूनगर महावितरण कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड

पुणे, दि. ९ सप्टेंबर २०२०: महावितरणकडुन अवाजवी वीजबिलांची आकारणी केली जात असल्याने राजगुरुनगर चांडोली येथील महावितरण कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत तोडफोड केल्याची घटना आज दुपारी घडली असुन राजगुरुनगर पोलीसांनी महावितरण कार्यालयाची पहाणी केली.

पुण्याच्या ग्रामिण भागात कोरोनाच्या महामारीने हाहाकार माजला आहे. अनेकांच्या हाताला काम नसुन सामान्य नागरिक घरात बसुन असताना वीज बील वाढीव आल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

आठ दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं होतं. याबाबत कोणतीही दखल घेतली नाही म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तोडफोड केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version