पुरंदर, दि. १५ जून २०२०: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने संपूर्ण देशभर वर्षपूर्ती जनसंपर्क अभियानाचे आयोजन केले आहे. पुरंदर तालुक्यात या अभियानाची सुरवात जेजुरी येथून करण्यात आली.
या अभियानात भाजप कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधून लिहलेल्या पत्राचे घरोघरी जाऊन वाटप करणार आहेत. या पत्रामध्ये मागील वर्षभरात केंद्र सरकारने घेतलेल्या अनेक महत्वपूर्ण निर्णयांचा व केलेल्या कार्याचा अहवाल मांडलेला आहे. पुरंदर तालुका भाजपच्यावतीने या अभियानाची सुरुवात जेजुरी येथून करण्यात आली.
यावेळी पुरंदर तालुका अध्यक्ष राजेंद्र जगताप भाजपचे कार्याध्यक्ष निलेश जगताप, संघटन सरचिटणीस श्रीकांत थिटे, श्रीकांत ताम्हाणे, चिटणीस विजय जगताप, किशोर घोरपडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी या उपक्रमाची माहीती शहर अध्यक्ष सचिन पेशवे यांनी दिली तसेच सर्व मान्यवरांचे आभार गणेश भोसले यांनी मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे
