गोल पोस्ट महाराष्ट्र तुमसरमध्ये ग्रामसेविकेच्या स्कुटीवर माकडाने उडी घेतल्याने अपघात

तुमसरमध्ये ग्रामसेविकेच्या स्कुटीवर माकडाने उडी घेतल्याने अपघात

भंडारा २८ मे २०२४ : भंडाऱ्यातील सुकळी येथील ग्रामसेविका ए.आर रगडे हे आपल्या स्कुटीने सुकळी येथे जात असताना माकडाच्या कळपातील एका माकडाने अचानक त्यांच्या स्कुटीवर उडी घेतली. त्यामुळे घाबरून गेलेल्या गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात ग्रामसेविका रगडे या गंभीररीत्या जखमी झाल्या असून त्यांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू त्यांची तब्येत जास्त गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ त्यांना नागपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नितीन कुथे

error: Content is protected !!
Exit mobile version