गोल पोस्ट महाराष्ट्र संस्थेला ६० वर्ष पूर्ण झाल्याने संस्थेला ६० लाखाचा निधी उपलब्ध करून देईल...

संस्थेला ६० वर्ष पूर्ण झाल्याने संस्थेला ६० लाखाचा निधी उपलब्ध करून देईल – खासदार सुनील तटकरे

मंडणगड, रत्नागिरी, ३० जानेवारी २०२४ : दि यंग पीपल एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित लटवन येथील नॅशनल हायस्कुलच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमच्या पार्श्वभूमीवर आज रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी या शाळेला भेट दिली. यावेळी संस्थेला ६० वर्षपूर्ण झाली या उद्दिष्टाने शाळेत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी खासदारांनी शाळेला कोणताच निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देत त्यांच्याकडून कोणतीच तफावत होणार नसल्याचं प्रतिपादन केलं. शाळेच्या बांधणीकरिता ज्येष्ठानी प्रचंड मेहनत घेतल्याने आज नॅशनल शाळा उभी राहिली हे उद्याच्या भविष्यातील मुलांसाठी महत्वाचं आहे, आणि यामुळे हेच विद्यार्थी उद्याचे भविष्य घडवू शकतील असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवाय तालुक्यातील अल्पसंख्यांक समाज हा खासदार सुनील तटकरे यांच्यावर ठाम विश्वास ठेवून आहे त्यामुळे या समाजाचे प्रश्न फक्त नि फक्त तटकरेच मार्गी लावू शकतात असं वक्तव्य तालुका अध्यक्ष मुजफ्फर मुकादम यांनी व्यक्त केल आहे. याप्रसंगी मंडणगड तालुका अध्यक्ष मुजफ्फर मुकादम, यांच्यासह अनेक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते

न्यूज अनकट प्रतिनिधी : गणेश म्हाप्रळकर

error: Content is protected !!
Exit mobile version