गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई-बंगळुर राष्ट्रीय महामार्ग पुन्हा ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई-बंगळुर राष्ट्रीय महामार्ग पुन्हा ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

धायरी, २४ जुलै २०२३ : वडगाव बुद्रुक येथील मुठा नदी पुलावर झालेल्या खड्ड़यांमुळे, आज पुन्हा सोमवार २४ जुलै रोजी सकाळी सहा वाजल्यापासून मुंबई बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. वडगाव बुद्रुक मुठा नदी पुलापासून दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.

या वाहतूक कोंडीत शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने, कामगार, रुग्णवाहिका, पालक-विद्यार्थी, बसेस, मालवाहतूक करणारी वाहने चार तास या कोंडीत अडकून पडलेली आहेत. पोलिसांचा जीव कोंडी सोडवता सोडवता मेटाकुटीला आला आहे. वाहन चालक, नागरिक सर्वच जण या कोंडीमुळे त्रस्त झाले आहेत. वडगाव, धायरी, नऱ्हे, आंबेगाव व सिंहगड रोड यामुळे ठप्प झालेला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version