गोल पोस्ट आरोग्य महापालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंचे होणार वाटप

महापालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंचे होणार वाटप

पुणे, दि.८ मे २०२० : कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या वतीने प्रतिबंधित क्षेत्रात मोफत मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप आज (शुक्रवार) पासून करण्यात येणार आहे.

सध्या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना आत व बाहेर जाता येत नसल्याने या परिसरातील नागरिकांना पुणे महानगरपालिकेच्या वतीने घरोघरी मोफत मास्क व रेशन वितरित करण्यात येणार आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ व महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

नागरिकांना देण्यात येणाऱ्या रेशन किटमध्ये जीवनावश्यक वस्तू अर्थात साखर, पीठ, गोडेतेल, तूरडाळ, तांदूळ, पोहे, मीठ, साबण, मिरची पावडर, चहापावडर व दुधपावडर या जीवनावश्यक वस्तूंचा रेशन किटमध्ये समावेश आहे.

या वस्तूंचे वितरण लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत केले जाणार आहे. वस्तूंच्या रेशन किटची थैली परिसरातील संबंधित लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्या उपस्थितीत वितरण केले जाणार आहे.

त्यामुळे प्रतिबंधित ६९ क्षेत्रातील सुमारे ७० हजार घरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करण्यात येणार असल्याचे महापौर मोहोळ आणि आयुक्त गायकवाड यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version