गोल पोस्ट गुन्हा वाघोली मध्ये दगडाने ठेचून एका मध्यमवयीन व्यक्तीचा खून

वाघोली मध्ये दगडाने ठेचून एका मध्यमवयीन व्यक्तीचा खून

वाघोली, दि. १९ जुलै २०२०: आज वार रविवार दि. १९ जुलै २०२० रोजी वाघोली येथील चोखीढाणी येथील रोड वरील पोद्दार स्कूल जवळ अंदाजे वय ३५ वर्षे एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना रविवारी दिनांक १९ जुलै रोजी उघडकीस आली आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हालविला आहे.

रंग सावळा उंची मध्यम गळ्याभोवती फिकट निळ्या रंगाचा रूमाल अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, राखाडी कलरची पॅन्ट आहे. त्याच्या उजव्या हातावर कविता तर डाव्या हातावर प्रिया असे नाव गोदलेलं आहे. अशा वर्णननाच्या व्यक्तीची माहिती असल्यास लोणीकंद पोलीस स्टेशन ९५२७०६९१०० वर संपर्क साधावा असे आव्हान पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version