गोल पोस्ट महाराष्ट्र छत्रपती संभाजी नगरच्या पिशोर येथे ‘विश्वशांतीसाठी’ मुस्लिम बांधवाचा इज्तेमा

छत्रपती संभाजी नगरच्या पिशोर येथे ‘विश्वशांतीसाठी’ मुस्लिम बांधवाचा इज्तेमा

कन्नड, छत्रपती संभाजी नगर २७ नोव्हेंबर २०२३ : छत्रपती संभाजी नगरच्या कन्नड तालुक्यातील पिशोर येथे दोन दिवसीय तबलीगी इज्तेमास थाटात प्रारंभ झाला. दिवसभर विविध मौलानांचे उपदेश, जमात साठी तश्कील आदी कार्यक्रम घेण्यात आले. विश्वशांतीसाठी परिसरातील सुमारे शंभर गावातील मुस्लिम बांधव यात सहभागी झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या इज्तेमाची तयारी सुरू होती.

गावातील हिंदू बाधवांनी इज्तेमासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी इज्तेमासाठी येणाऱ्या नागरीकांसाठी तहारत खाने, चहाची, पाण्याची, खान्याची तसेच वैद्यकीय अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या ठिकाणी सकल मराठा समाजाच्यावतीने मोफत पाणी वाटप करण्यात आले. इज्तेमासाठी तरुण, अबाल, वृद्ध यशस्वितेसाठी प्रयत्न केले असुन मौलाना जावेद सहाब पूनावाला यांच्या उपदेश आणि दुआ नंतर रविवारी संध्याकाळी इज्तेमाची सांगता झाली.

न्युज अनकट प्रतिनीधी : मिलिंद कुमार लांडगे

error: Content is protected !!
Exit mobile version