गोल पोस्ट क्रीडा नगरच्या क्रिकेटला नवी दिशा; रणजी संघात दोन नगरकर

नगरच्या क्रिकेटला नवी दिशा; रणजी संघात दोन नगरकर

मुंबई : रणजी स्पर्धेसाठी ‘क’ गटात महाराष्ट्राची सलामीची लढत ९ डिसेंबर रोजी रोहतक येथे हरयाणाशी होणार आहे. रणजी करंडक हि क्रिकेट् स्पर्धा देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोच्च स्पर्धा समजली जाते.
या स्पर्धेमध्ये नगरचा अष्टपैलू क्रिकेटर अझीम काझी याचा महाराष्ट्र संघात समावेश करण्यात आला आहे. नगरच्याच अनुपम संकलेलाही संघात स्थान देण्यात आले आहे.
महाराष्ट्र संघाकडून रणजी खेळण्यासाठी २ नगरकर खेळाडू असणे, अशी हि पहिलीच वेळ आहे.
अझीम हा डावखुरा फिरकी गोलंदाज असून तो आक्रमक फलंदाजीसाठीसुद्धा ओळखला जातो. तसेच अनुपम हा वेगवान गोलंदाज असून त्यानेसुद्धा आजपर्यंत भरीव कामगिरी केली आहे. दरम्यान, रणजी सामन्यांसाठी नगरच्या दोन खेळाडूंचा महाराष्ट्राच्या संघात समावेश झाल्याने नगरकरांकडून त्यांच्यावर अभिनंदन तसेच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version