गोल पोस्ट महाराष्ट्र घनसावंगी तालुक्यातील रांजणीत नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन

घनसावंगी तालुक्यातील रांजणीत नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन

जालना, ७ फेब्रुवारी २०२४ : युवकांमधील क्रीडा कौशल्याला वाव मिळावा यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नमो चषक क्रीडा महोत्सवास घनसावंगी मतदारसंघात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांच्या हस्ते रांजणी येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे तर समृद्धी साखर कारखान्याच्या मैदानावर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नमो चषक व्हॉलीबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ झाला असून विजेत्या संघाना रोख पारितोषिके देण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील युवा खेळाडूच्या कौशल्य गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना राज्य आणि देश स्तरावर त्यांचे कौशल्य दाखवता यावे म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात जालना व घनसावंगी तालुक्यातील क्रिकेट संघाच्या स्पर्धा होत आहे. या स्पर्धेतून विजयी होणाऱ्या संघाची विधानसभा स्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version