गोल पोस्ट स्पॉटलाइट नंदिनी गुप्ताने पटकावला फेमिना मिस इंडिया २०२३ चा किताब

नंदिनी गुप्ताने पटकावला फेमिना मिस इंडिया २०२३ चा किताब

मणिपूर,१६ एप्रिल २०२३: भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारी घटना शनिवारी घडली आहे. राजस्थानच्या नंदिनी गुप्ताने फेमिना मिस इंडिया २०२३ चा मुकुट पटकावला आहे. इम्फाळच्या खुमन लम्पक स्टेडियम, मणिपूर येथे या भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते आणि रात्री नेहा धुपिया, मनीष पॉल, कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांच्यासह अनेक दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण सभागृह भरले होते. मणिपूर मध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या स्पर्धेत तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता.

१९ वर्षीय नंदिनी हिला गेल्या वर्षीची विजेती ठरलेल्या सिनी शेट्टीने मिस इंडिया चा मुकुट प्रदान केला तर दिल्लीची श्रेया पुंजा ही पहिली उपविजेती ठरली त्याचप्रमाणे मणिपूरची थौनाओजम स्ट्रेला लुवांग ही द्वितीय उपविजेती ठरली.ज्युरी पॅनेलमध्ये नेहा धुपिया, कोरिओग्राफर टेरेन्स लुईस, चित्रपट दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी, बॉक्सर लैश्राम सरिता देवी आणि डिझाइनर रॉकी स्टार आणि नम्रता जोशीपुरा यांचा समावेश होता.

नंदिनी गुप्ताने एकोणिसाव्या वर्षी मिस इंडियाचा किताब जिंकला. ती मूळची कोटा येथे असून अभिनेत्री प्रियंका चोप्राकडून प्रेरणा घेत असल्याचा तिने सांगितले. तर,’ मानवतेसाठी सर्व काही करणाऱ्या जे मिळाले त्यातून बहुतांश रक्कम दानधर्मासाठी वापरणाऱ्या’ रतन टाटांना प्रभावशाली व्यक्तिमत्व असे म्हणत तिने त्यांच्या प्रति आदरही व्यक्त केला आहे. नंदिनीने अवघ्या दहाव्या वर्षीपासून मिस इंडियाचा किताब जिंकण्याचा स्वप्न पाहिलं होतं ते अखेर आज प्रत्यक्षात आले आहे.

शनिवारी ती काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये अतिशय सुंदर दिसत होती तर तिचा हा गाऊन काळ्या दगडांसह सजवला गेला होता. तिचा या अप्रतिम पेहरावाबरोबरच तिच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि तिच्या विचारांचा जोरावर तिने मिस इंडियाचा किताब पटकावला. फेमिना मिस इंडियाच्या विजयानंतर नंदिनी संयुक्त अरब अमिरातील पार पडणाऱ्या ७१ व्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

https://www.instagram.com/p/CrEzG8YSKSc/?igshid=MjljNjAzYmU=

फेमिना मिस इंडियाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वरून नंदिनी गुप्ता चे फोटो पोस्ट करून त्याला त्यांनी कॅप्शन दिला आहे की, ‘नंदी गुप्ताने आमचा मंच जिंकला आहे आणि तिच्या सहनशक्ती आणि सौंदर्याने आमच्या हृदयावर कब्जा केला आहे.आम्हाला तिचा खूप अभिमान आहे आणि तिला मिस वर्ल्ड स्टेजवर पाहण्याची प्रतीक्षा करू शकत नाही! आम्हाला तुमच्या प्रवासाचा आणि तुमच्या पूर्ण श्रेयावर मुकुट मिळविण्यासाठी तुम्ही हाती घेतलेल्या सर्व मेहनतीचा अभिमान वाटतो.लेडीज आणि जेंटलमन, तुमची नवीन राज्य करणारी राणी, नंदिनी गुप्ता फेमिन मिस इंडिया २०२३ चे स्वागत करा. नंदिनी गुप्ता यांचे हार्दिक अभिनंदन!!

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे.

error: Content is protected !!
Exit mobile version