गोल पोस्ट राजकारण नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार……

नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार……

जळगाव, १० ऑगस्ट २०२० : भाजपचे खासदार नारायण राणे हे रोज सराकारवर टिका करत ताशेरे ओढण्याचे काम करत आहेत.”पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही”अशी टीका केलेले भाजप खासदार नारायण राणे यांनी केली होती. त्यांच्या याच टिकेला आता शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी चोख प्रत्युत्तर देत नारायण राणेंचा समाचार घेतला आहे.

नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही.ते घरी काही बोलतात,बाहेर काही वेगळेच बोलतात.शेवटी त्यांना अशी विधाने करुन स्वतःचा टीआरपी म्हणजेच प्रसिद्धी मिळवायची असते.नारायण राणे प्रसिद्धीसाठी बोलतात त्यांनी जर असे काही बोलले नाही तर त्यांच्याकडे कुणी लक्ष देणार नाही, असा चिमटा घेत गुलाबराव पाटील म्हणाले,राणे स्वतः मुख्यमंत्री असताना कोकणात कोणताही नवीन प्रकल्प आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टींविषयी काहीच बोलूच नये.

गुलाबराव पाटलांच्या अशा घणघणाती टिकेला आता भाजप खासदार नारायण राणे काय उत्तर देणार याकडे माध्यमांचे लक्ष लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version