गोल पोस्ट इतर राजकारण आगामी निवडणुकीच्या तोंडावर नारायण राणेंनी कार्यकर्त्यांना दिल्या धमकीवजा सूचना

आगामी निवडणुकीच्या तोंडावर नारायण राणेंनी कार्यकर्त्यांना दिल्या धमकीवजा सूचना

नवी दिल्ली:३१ ऑक्टोबर २०२१; आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी आता तयारी सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केलं आहे. तसंच कोणत्याही कार्यकर्त्यांनी गद्दारी केलेली मला चालणार नाही, असं सांगत खडसावलंही आहे.

यावेळी सभेत बोलताना ते म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्णपणे सत्ता भाजपची पाहिजे. मला येणाऱ्या निवडणुकीत
गद्दारी अजिबात चालणार नाही. माझ्या निवडणुकीत जे झालं ते आता खपवून घेणार नाही. गद्दारी कराल तर
हकालपट्टी सोडाच पण दुसरं काय करायला लावू नका”असा दमच त्यांनी यावेळी दिला.

कार्यकर्त्यांना इशारा देताना नारायण राणे म्हणाले, “जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका या
मध्ये सत्ता भाजपाची पाहिजे. जिल्हा परिषद निवडणुकीत तीन विरुद्ध एक आहोत. मला ४६ जिल्हा परिषद सदस्य
जिल्हा परिषदेत निवडून गेलेले पाहिजेत. वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवा. नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी.नडडा यांना
दाखवून द्या की सिंधुदुर्ग जिल्हात शंभर टक्के भाजप आहे. हा सिंधुदुर्ग जिल्हा शंभर टक्के नारायण राणे यांच्या सोबत
आहे हे दाखवून द्या. फितुरी तर मी खपवूनच घेणार नाही. उद्धव ठाकरे काय बोलतो तुम्ही चिपीत बघितलं. मला शत
प्रतिशत भाजपा हवाय. मी डिसेंबरमध्ये शिवसेनेसह अन्य कार्यकर्त्यांना प्रवेश देणार आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

 

न्यूज अनकट प्रतिनिधी; किरण कानडे.

error: Content is protected !!
Exit mobile version