गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय नेपाळचे पंतप्रधान पूष्प कमल दहल यांच्या पत्नीचे निधन

नेपाळचे पंतप्रधान पूष्प कमल दहल यांच्या पत्नीचे निधन

नेपाळ, १२ जुलै २०२३: नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांच्या पत्नी सीता दहल यांचे आज सकाळी, वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले आहे. त्या दीर्घकाळ आजारी होत्या. त्यांना आज सकाळी आठ वाजता हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी खूप प्रयत्नानंतरही त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही. त्यानंतर ८ वाजून ३३ मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

सीता दहल प्रोग्रेसिव सुप्रान्युक्लियर पाल्सीने पीडित होत्या. याशिवाय त्यांची पार्किंसन, डायबिटीस टाईप-२ आणि हायपरटेंशनची देखील तक्रार होती. मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रकृती बिघाडल्यानंतर सीता दहल यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना पुढील उपचारासाठी भारत आणि नेपाळमधील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version