गोल पोस्ट क्रीडा नेदरलँड्सवर भारताचा दुसरा विजय

नेदरलँड्सवर भारताचा दुसरा विजय

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था) : एफआयएच प्रो-लीग हाॅकी स्पर्धेत भारतीय हाॅकी संघाने पेनल्टी शूटआउटमध्ये ३- १ असा पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात भारताने ५-२असं विजय मिळवला होता.
भारतीय संघातील ललित उपाध्यायने २५ व्या मिनिटाला, मनदीप सिंगने ५१ व्य मिनिटाला आणि रूपिंदरपाल सिंगने ५५ व्या मिनिटाला गोल केला.
नेदरलँड्सकडून वीरडेन वान डेर मिंकने २४ व्या मिनिटाला, जेरोन हर्टसबर्गने २६ व्या मिनिटाला, आणि केलेरमैन ब्योर्नने २७ व्या मिनिटाला गोल केला.
अशा प्रकारे सामन्याच्या निर्धारित वेळेत दोन्ही संघामध्ये ३-३ अशी गोल बरोबरी झाली होती. दरम्यान, पेनल्टी शूटआउटमध्ये विवेकसागर प्रसाद, आकाशदीप सिंग आणि गुजरंत सिंग यांनी गोल नोंदवत विजय साकारला.

error: Content is protected !!
Exit mobile version