गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट टी ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पहिला सेमीफायनल सामना सुरु

टी ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पहिला सेमीफायनल सामना सुरु

पुणे ,९ नोव्हेंबर २०२२ : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी ट्वेंटी वर्ल्डकप चा पहिला उपांत्य फेरीचा सामना आज पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील सिडनी क्रिकेट स्टेडियमवर सुरु झाला आहे.

या वर्ल्डकप मध्ये न्युझीलंडचा खेळ बघता गतविजेत्या ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि श्रीलंकेचा पराभव करून गट अ मध्ये अव्वल स्थान पटकावले. आणि अंतिम चार मध्ये स्थान मिळवलं. तर पाकिस्तानचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास खूप चढ – उताराचा होता. पण आतापर्यंतच्या आकडेवाडी नुसार पाकिस्तान संघाचा न्यूझीलंड विरुद्ध टी ट्वेंटी चा रेकॉर्ड खूप चांगला आहे. यांच्यात आत्तापर्यंत २८ टी-ट्वेंटी सामने खेळले गेले. त्यातील १७ सामने जिंकत पाकिस्तान आघाडीवर आहे. त्यामुळे आजचा सामान चांगलाच चुरशीचा होणार आहे. कारण दोन्ही संघांमध्ये चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळे या सामन्यात गोलंदाजाचा सामना फलंदाज कसे करतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान आजचा हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सिडनी क्रिकेट स्टेडियमवर सुरु झाला आहे. आधी नाणेफेक जिंकून न्यूझीलंड ने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version