गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे गोळीबार प्रकरणातुन निलेश घायवळचे नाव हटवण्यासाठी उच्च न्यायालयात रिट पिटीशन

गोळीबार प्रकरणातुन निलेश घायवळचे नाव हटवण्यासाठी उच्च न्यायालयात रिट पिटीशन

कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मागील महिन्यात घायवळ टोळीतील काही सदस्यांनी कोथरूड परिसरात एका इसमावर गोळीबार करून दहशत माजवली होती. त्याच रात्री, घायवळ टोळीच्या गुंडांकडून आणखी एका इसमाला शस्त्राचा धाक दाखवत मारहाणही झाली होती. या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी निलेश घायवळसह संपूर्ण घायवळ टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. मात्र, आता या कारवाईनंतर निलेश घायवळच्या वकिलाने मोठा दावा केला आहे.

निलेश घायवळ आणि गोळीबार केलेल्या आरोपींचा काहीही संबंध नाही, तसेच निलेश घायवळ त्यांना ओळखत नसल्याचा वकिलांनी सांगितले आहे. पोलिसांनी मीडियाच्या दबावाखाली येऊन निलेश घायवळ याचे नाव या प्रकरणाशी जोडले आहे का, याचा तपास करण्यासाठी त्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली आहे. निलेश घायवळचे वकील विपुल दुशिंग यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली: “हा रस्त्यावरील भांडणाचा प्रकार आहे. रस्त्यावर अचानक झालेल्या भांडणातून एका गटाने दुसऱ्या गटावर केलेल्या गोळीबाराचा हा सगळा प्रकार आहे. पुणे पोलिसांकडून पहिल्या दिवशी सांगण्यात आले होते की यात कोणत्याही गँगचा संबंध नाही. मात्र माध्यमांमधून वारंवार प्रेशर आले आणि निलेश घायवळ यांचे नाव या प्रकरणात समाविष्ट केले गेले आहे. म्हणूनच आम्ही कोर्टात रिट पिटीशन दाखल केली आहे.”

निलेश घायवळच्या म्हणण्यानुसार, गोळीबार करणारे आणि तो यामध्ये कधीही प्रत्यक्ष संपर्कात आला नाहीत. त्यांची कधीही भेट किंवा फोनवर संभाषण झालेले नाही. यामुळे त्यांचे नाव या प्रकरणात जोडले जाणे चुकीचे असल्याचे त्यांनी कोर्टात आवर्जून नमूद केले आहे.

दरम्यान, निलेश घायवळला परदेशातून परत आणण्याच्या प्रक्रियेला पुणे पोलिसांनी सुरुवात केली आहे. दुसरीकडे, वकिलांनी दाखल केलेल्या रिट पिटीशनमुळे प्रकरणाच्या पुढील घडामोडी आणि न्यायालयीन निर्णयावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version