गोल पोस्ट आरोग्य पिंपरी चिंचवडमधील चार खाजगी बड्या रुग्णालयांना नोटीसा

पिंपरी चिंचवडमधील चार खाजगी बड्या रुग्णालयांना नोटीसा

पुणे, दि. ७ ऑगस्ट २०२०: पिंपरी चिंचवड येथील खाजगी रुग्णालये मोठे बिल आकारात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शहरातील आदित्य बिर्ला, डी. वाय. पाटील, सिटी केअर व स्टार मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

महापालिकेने नेमणूक केलेल्या समितीमध्ये जास्त बिले आकारल्याचे समोर आले आहे. या रुग्णालयांनी नियमांचे उल्लंघन केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या रुग्णालयांना महानगर पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

या रुग्णालयांनी सरासपणे नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे अशा रुग्णांना रुग्णालयात भरती केले जात असल्याचं निदर्शनास आले आहे. त्यामुळे वरील हॉस्पिटलला नोटीस काढले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version