गोल पोस्ट महाराष्ट्र नेपाळ मधील राष्ट्रीय स्तरावरील हॅमर थ्रो, गोळा फेक स्पर्धेत जाफ्राबादचा ओम व्यवहारे...

नेपाळ मधील राष्ट्रीय स्तरावरील हॅमर थ्रो, गोळा फेक स्पर्धेत जाफ्राबादचा ओम व्यवहारे प्रथम

जालना १० जानेवारी २०२४ :जाफ्राबाद तालुक्यातील आंबेगाव (डहाकेवाडी) येथील बुरकुल वस्तीवर राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी ओम अंकुश व्यवहारे याने हॅमर थ्रो आणि गोळा फेक या खेळ प्रकारामध्ये राष्ट्रीय स्तरावर नेपाळमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल आ.संतोष दानवें च्या भोकरदन येथील निवासस्थानी त्याचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

भोकरदन-जाफ्राबाद भागातील खेळाडू आपल्या कौशल्याच्या माध्यमातून गावाचे आणि राज्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर मोठे करत आहे याचा मनस्वी आनंद वाटतो असे यावेळी आ.दानवे म्हणाले. याप्रसंगी ओम चे आई-वडील, भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे

error: Content is protected !!
Exit mobile version