गोल पोस्ट इतर राजकारण ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला

ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला

शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर प्रचारसभे दरम्यान चाकू हल्ला झाला आहे.

त्यांचे बंधू जयराजे निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
प्रतिक्रिया देताना जयराजे झाले भावुक झाले त्यांना अश्रू अनावर झाले. आम्ही आमचे वडील देखील असेच गमावले आहेत असे ते पुढे ते म्हणाले
गर्दीमधून येऊन एका तरुणाने आधी पाया पाडण्याचे नाटक करून मग त्यांच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला असे ओमराजे निंबाळकर म्हणाले .
परंतु वेळीच लक्ष गेल्यामुळे आणि त्याच्या हातात चाकू दिसला म्हणून मी सावध झालो आणि थोडक्यात बचावलो असल्याचं त्यांनी सांगितले.
आणि किरकोळ दुखापत झाली असून कार्यकर्त्यांनी सय्यम बाळगावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

आई तुळजाभवानी आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी सुखरूप आहे असे ते म्हणाले. अजिंक्य टाकळे असे हल्लेखोराचे नाव असल्याचे कळले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version