गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे वललभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मनपा मध्ये ‘राष्ट्रीय एकता दिवस’ शपथ कार्यक्रम...

वललभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मनपा मध्ये ‘राष्ट्रीय एकता दिवस’ शपथ कार्यक्रम संपन्न

पुणे, ३१ ऑक्टोबर २०२०:श्री जगद्गुरू महर्षी वाल्मिक स्वामी यांच्या जयंतीनिमित्त व देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पालिकेत त्याच्या प्रतिमेस महापौर मुरलीधर मोहोळ यांचा हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणार्‍या ‘राष्ट्रीय एकता दिवस’ च्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी तसेच दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची शपथ पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आली.

याप्रसंगी उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेंडगे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप, तसेच पालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

error: Content is protected !!
Exit mobile version