गोल पोस्ट महाराष्ट्र महिला दिनाच्या निमित्ताने मतदार जागृतीसाठी विविध स्पर्धेचे भोकरदनमध्ये आयोजन

महिला दिनाच्या निमित्ताने मतदार जागृतीसाठी विविध स्पर्धेचे भोकरदनमध्ये आयोजन

भोकरदन, १३ मार्च २०२४ : पंचायत समिती भोकरदन मार्फत महिला दिनाच्या निमित्ताने मतदार जागृतीसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शि. वि.अधिकारी, बी. एल. बडगे, डॉ. प्रफूल्लता भिंगोले यांनी या स्पर्धेचे आयोजन केले. यात रांगोळी, चित्रकला आणि घोषवाक्य या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यातील घोषवाक्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जवखेडा ठोंबरे शाळेतील कु. प्रगती दादासाहेब ठोंबरे, चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील भाग्यश्री राम सोनवणे तर रांगोळी स्पर्धत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील आकांक्षा पूंजाजी सपकाळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय ठोंबरे, सरपंच लक्ष्मण ठोंबरे, केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर निहाळ, मुख्याद्यापक विठ्ठल घायाळ, श्रीकांत सुरडकर, पी. व्ही. मिसाळ, भारत दांडेकर, दयानंद घोरपडे, ए. बी. काशिद, संजय शिंगणे, शिल्पा जाधव, श्रृती ठोंबरे आदींनी अभिनंदन केले

न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे

error: Content is protected !!
Exit mobile version